नाखरे येथे सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; संशयिताविरुद्ध गुन्हा

पावस:- तालुक्यातील नाखरे येथील रामेश्वरवाडी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर मद्यपान करणाऱ्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. जनार्दन शंकर नमसले (वय ५५, रा. नाखरे, रामेश्वरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नाखरे-रामेश्वरवाडी अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे मद्यपान करण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्यपान करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश कुबडे यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.