नांदिवडे येथे ट्रकची मोटारीला धडक; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड-नांदिवडे कमान रस्त्यावर १४ चाकी ट्रक ने मोटीरीला धडक दिली. या अपघातातील ट्रक चालकाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सुनिल श्रीकांत वाटमकर (वय २५, रा. पढतरवाडी, कन्हाळ रोड, ता. अतनी, जि. बेळगाव राज्य कर्नाटक) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) रात्री पावणेनऊच्या सुमारास नांदिवडे कमानीच्या समोरील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीकृष्ण अनंत बिवलकर (वय ३४, रा. नांदिवडे- विठ्ठलवाडी, रत्नागिरी) मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ५६०९) ही घेऊन जयगड पोलिस चेकपोस्ट ते नांदिवडे असा प्रवास करत होते. नांदिवडे पार्किंगचे ठिकाणी नांदिवडे कमानीच्या समोरिल रस्त्यावरुन रस्ता क्रॉस करुन पुढे गेल्यावर जयगड ते खंडाळा अशा रोडने येणारा १४ चाकी ट्रक (क्र. के. अे-२८ सी ६६४०) वरिल चालकाने फिर्यादी श्रीकृष्ण बिवलकर यांच्या मोटारीला धडक देऊन अपघात केला. या प्रकरणी श्रीकृष्ण बिवलकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.