रत्नागिरी:- मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालात एकूण 8 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात कळंबणी येथील 1, कामथे येथील 7 जणांचा समावेश आहे.
नव्याने 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 1300 चा टप्पा पार केला आहे. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या रत्नागिरीकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
दरम्यान रत्नागिरीतील आणखी एका रुग्णाची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1308 झाली आहे.









