Thursday, June 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी धामणसेत गळफास घेत तरुणाची आत्महत्या

धामणसेत गळफास घेत तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील धामणसे हटवाडी येथे गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवार 17 जून रोजी सकाळी ६ वा.सुमारास उघडकीस आली.

अशोक बाळकृष्ण पवार (३५, रा. धामणसे हटवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अशोक हा मंगळवारी रात्री जेवण करुन आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला होता. बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह नवीन घरातील छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आला. अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. सुधाकर शांताराम पवार (रा. धामणसे हटवाडी रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत खबर दिली. पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे.