रत्नागिरी:- चिंद्रवली-कांबळेवाडी येथील चिरे खाणीवर दहा महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टपात पडून मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 2.30 वा. सुमारास उघडकीस आली.
सुमित अंकुश राठोड (10 महिने) असे बुडून मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अंकुश शिवाजी राठोड (28, मूळ रा. कर्नाटक सध्या रा. चिंद्रवली, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.









