दापोली:- डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या महिलेला उपचारासाठी एम. जी. एम मेडीकल कॉलेज व हॉस्पीटल कामोट नवी-मुंबई येथे दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ११) डिसेंबरला सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास कामोठे येथील हॉस्पिटल येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबरदेणार विश्वनाथ विठ्ठल चव्हाण (वय ४५, रा. नवानगर, दापोली) हे आपली पत्नी मंजुळा विश्वनाथ चव्हाण यांना दुचाकीवरुन घेऊन नवानगर ते दापोली असे जात होते. मंजुळा रस्त्यात दुचाकीवरुन घसरुन पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









