दुचाकीच्या ठोकरीत पादचारी महिला जखमी

रत्नागिरी:- निवेखुर्द गोठणे (ता. संगमेश्वर) येथील रस्त्यावर दुचाकीने मुलगा व आईला ठोकर दिली. यामध्ये दोघेही जखमी झाले. देवरुख पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश शांताराम शेळके (रा. आंगवली, ता. संगमेश्वर) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गितेश जयराम गोंधळी (वय ३६, रा. निवेखुर्द, ता. संगमेश्वर) हे व त्यांची आई सुनिता जयराम गोंधळी असे गोठणे पुनर्वसन येथील पालखीचा कार्यक्रम आटोपून देवरुख ते मार्लेश्वर जाणाऱ्या रस्त्याने चालत येत असताना निवेखुर्द गोठणे फाटा येथे देवरुखहून येणाऱ्या दुचाकी (क्र. एमएच-०८ बीजी ६९३८) वरिल संशयित चालकाने ठोकर दिली. या अपघात फिर्यादीची आई जखमी झाली. अपघात करुन स्वाराने पलायन केले. या प्रकरणी गितेश गोंधळी यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.