रत्नागिरी:- स्वतःच्या दुखापतीस व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष विरपक्ष सोलापूरे असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास गोवा ते मुंबई महामार्गावर संगमेश्वर रेल्वेस्टेशन स्टॉप येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सोलापुरे हे गोवा ते मुंबई महामार्गावरुन जात असताना संगमेश्वर रेल्वस्टेशन स्टॉप जवळ आले असताना देवरुख ते करजुवे जाणारी एसटी बसला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात स्वतः स्वाराला दुखापत झाली व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी भाऊ केतकर यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.