राजापूर:- दारूच्या नशेत बोटीवरून खाडीच्या पाण्यात पडलेल्या खलाशाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील साखरीनाटे-डुंगेरी जेटी येथे घडली. मदन हवलदार चौधरी (वय २३, रा. नेपाळ, सध्या रा. साखरीनाटे नजफनगर) असे मृत खलाशाचे नाव आहे.
नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन हवलदार चौधरी हा मोहसिन अब्दुल्ला कोतवडकर यांच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. १६ ला मदन हा दारूच्या नशेत बोटीवर कामासाठी आला होता. दारूच्या नशेत त्याचा बोटीवरून तोल जाऊन तो खाडीच्या पाण्यात पडला. ही बाब सहकारी खलाशांच्या लक्षात येताच त्यांनी पाण्यात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नव्हता. अखेर त्याचा शोध सुरू असताना रविवारी (ता. १८) जैतापूर खाडीतील नाटे डुंगेरी येथे पाण्यात मदन याचा मृतदेह आढळून आला.









