रत्नागिरी:- दहा दिवसांच्या बाप्पांना आज जिल्हाभरात निरोप दिला जाणार आहे. जिल्हाभरात ३६ हजार ८६० बाप्पांच्या मूर्तींचे आज विसर्जन करण्यात येईल. गौरी – गणपती विसर्जन मिरवणुकी नंतर अनंत चतुर्थीला होणारी विसर्जन मिरवणूक मोठी असल्याने बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यात गणेश चतुर्थीला दीड लाखा पेक्ष अधिक घरात गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. सर्वात. मोठे विसर्जन गौरी गणपतीला करण्यात आले. यावेळी एक लाख बाप्पांना निरोप देण्यात आला. वामन द्वादशीला दीड हजार बाप्पांना निरोप देण्यात आला. आता गुरवारी जिल्हाभरात ३६ हजार ८६० बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे.