Monday, July 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी थिबापॅलेस रोडवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

थिबापॅलेस रोडवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस- सुरेशा पॉईट येथील कच्चा रस्त्यावर विदेशी मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद दशरथ चव्हाण (वय २६, रा. पोमंडी खुर्द, चव्हाणवाडी, काजरघाटी, रत्नागिरी) व नंदन संतोष चव्हाण (वय २४, रा. पोमेंडी खुर्द, चव्हाणवाडी, रत्नागिरी) अशी संशयित तरुणाची नावे आहे. ही घटना शनिवारी (ता. ४) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी विदेश मद्यपान करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस हवालदार आशिष भालेकर व सहायक पोलिस फौजदार शैलेंद्र पारकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.