थिबा राजवाड्यात नव्या बारा दालनांच्या उभारणीसाठी तीन कोटी

रत्नागिरी:- ब्रिटिशकालीन थिबा राजवाड्यात बारा नवी दालने उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दालनांच्या उभारणीसाठी तीन कोटींचा प्रस्ताव पुरातत्व विभागाने राज्य शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली असून लवकरच या दालनांच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

थिबा राजवाडा पाहण्यासाठी देशासह परदेशातील अनेक पर्यटक, अभ्यासक मोठ्या संख्येने येत असतात. दोन वर्षांपूर्वी हा राजवाडा दुरूस्तीच्या कारणातून पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवण्यात आलेला होता. या राजवाड्याच्या दुरूस्तीची कामे अंतिम टप्प्यात गेल्यानंतर राजवाड्याचे अंतरंग पुरातत्व विभागाने पर्यटकांसाठी खुले केले. पर्यटन निधीतूनही या स्थळाचा विकास करण्यासाठी पयत्न सुरू करण्यात आले. पण मागील काळात त्याला मूर्त स्वरूप येत नव्हते. या वास्तू व परिसराच्या देखभाल व दुरूस्तीसाठी कोट्यावधींचा निधी खर्च होत आहे. राजवाड्याच्या दुरूस्तीसाठी निधी आला होता. मात्र दुरूस्तीची कामे व परिसराचा विकास अजूनही पलंबित आहे.

ही वास्तू जुनी असल्याने देखभाल व दुरूस्तीसाठी निधीची गरज भासते. हे राज्य संरक्षित स्मारक आहे. जतन-दुरूस्ती योजनेतून टप्प्याटप्प्याने निधी देण्यात आला आहे. राजवाड्याच्या छताची एक कोटीची कामे करण्यात आली. त्यानंतर पाप्त झ्घलेल्या निधीतून खिडक्या, दरवाजे, बडोद बदलणे, लाद्याआदी कामे झाली. त्यासाठी एक कोटी 35 लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्याच निधीतून छत, गलरी, खिडक्या, जिने व अन्य छोटीमोठी नूतनीकरणाची कामे पूर्ण झाली होती. खोल्यांच्या दुरूस्तीची कामे करण्यात आली. अजूनही काही कामे शिल्लक आहेत.

राजवाड्यात एकूण 14 खोल्या आणि दोन मोठी दालने आहेत. थिबा राजवाडा हे पर्यटकांचे पमुख आकर्षण आहे. हा राजवाडा पर्यटकांचे पमुख आकर्षण व्हावा, यासाठी राजवाड्यात 12 विविध संग्रहित कला व वस्तूंची दालने उभारण्यात येणार आहेत. ऐतहासिक वस्तूंचे दालन, शस्त्रास्त्रे दालन, विविध मूर्तीं दालन, पुरातन नौका दालन, पुरातन वस्तू दालन, चित्रदालन अशा अन्य काही दालनांचा समावेश आहे. उर्वरित दोन दालनापैकी एका दालनात तोफा व जुन्या वस्तू पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे थिबापŸलेसला नवी झळाळी मिळणार आहे.

यासंदर्भात येथील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक ए.पी.वहाणे यांच्याशी संपर्प साधला असता सांगितले की, पुरातत्व विभागाकडून कलादालन निर्मितीसाठीचा पस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्या पस्तावाला शासनाने पशासकीय मान्यता दिलेली आहे. त्या कामाचे टेंडर झालेले आहे. शासनाकडून मंजूरी मिळताच तात्काळ दालन निर्मिती कामाला पारंभ होणार आहे.