थकीत वीज बिल भरण्यासाठी अवधी मिळावा; राष्ट्रवादीची महावितरणकडे मागणी

रत्नागिरी:-थकीत वीजबिल वसुली करिता धडक मोहीम महावितरण ने सुरू केली असून ती त्वरित थांबवावी व लोकांना ठरावीक कालावधीत वीजबिल भरण्यासाठी वेळ द्यावा. ह्याबाबतीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, रत्नागिरी शहर तर्फे निवेदन देण्यात आले.
 

गेले दीड वर्षे पूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्यामुळे पुर्ण जगातील व्यवहार लॉकडाऊन मुळे बंद पडले होते. त्यामुळे जनता पूर्ण त्रस्त झाली. यातच अनेकांची नोकरी गेल्याने, उद्योगधंदे बंद पडल्याने जनतेला फार अडचणीचा सामना करावा लागत आहे. यातच नुकतीच अनलॉकची प्रक्रिया सुरु होऊन उद्योगधंदे सुरु करण्यात आलेत. परंतू उत्पन्न मर्यादीत असल्याने व खर्च वाढत असल्याने ताळमेळ साधला जात नाही आहे. यातच MSEB तर्फे अचानक धडक विजतोडणी सुरु करण्यात आल्याने व्यापारी, मच्छिमार, नोकरदार यांना त्याचा त्रास होत आहे. तरी आपण ठरावीक मुदत देऊन रितसर नोटीस प्रक्रिया राबवून कारवाई करावी व धड़क विज तोडणी मोहीम राबवू नये हि नम्र विनंती .    यावेळी जेष्ठ नेते कुमार शेट्ये, जेष्ठ नेते रामभाऊ गराटे,शहराध्यक्ष निलेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, जिल्हा सरचिटणीस सचिन कोतवडेकर, रवी रूमडे, सनीफ गवाणकर,नागेश जागुष्टे,शफीक दर्वे ,संदीप नार्वेकर,अमोल पावसकर,स्वप्नील मांडवकर आदी उपस्थित होते.