तरवळ येथे आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील तरवळ-माचिवलेवाडी येथील वृद्धाने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी दामा माचिवले (वय ७०, रा. तरवळ -माचिवलेवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १७) दुपारी अडीच ते पावणे चारच्या सुमारास तरवळ-माचिवलेवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध शिवाजी माचिवले यांना गेली २८ वर्षे मेंदुला रक्त पुरवठा कमी होत असल्याचा आजार होता. त्यांच्याव रत्नागिरी व मुंबई येथे उपचार सुरु होते. त्या आजाराला कंटाळून त्यांनी शुक्रवारी रहाते घराचे छपराचे वाशाला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. या प्रकरण नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.