रत्नागिरी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड) येथे राष्ट्रपती महामहिम राम नाथ कोविंद हे येथे 06 डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भेट देणार आहेत.
या भेटी दरम्यानच्या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन याबाबत आज जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात सर्व संबधित विभागांनी करावयाच्या कामांबाबत चर्चा झाली. राष्ट्रपती 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यात येत असून त्यात ते आंबडवे गावात असणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देणार आहेत.