Monday, May 25, 2026
spot_img
Home चिपळूण ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

वालोपे येथील घटना; अन्य दोघे गंभीर जखमी

चिपळूण:- मुंबई – गोवा महामार्गांवर वालोपे येथे एका ट्रॅकने दुचाकीला मागून धडक दिल्याने 2 वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. सदर बालिकेचे आई- वडील गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पकडले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. रात्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वालोपे येथे हायवेला ट्रकने टू व्हीलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका बालिकेचा जागीच दुर्दैवी मुत्यू झाला. सदर बालिकेचे आई- वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात उपचारासाठी हलवले आहे. तर बालिकेचा मृतदेह महामार्गवरच ठेवण्यात आला आहे. गाडी चालक पळून गेला परंतु नंतर त्याला पकडण्यात आले. या घटनेनंतर संतप्त वालोपे ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर आले व त्यांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी असंतोष वाढला होता. दरम्याने तेथे पोलीस दाखल झाले. पोलीस व ग्रामस्थांमध्येही शाब्दिक चकमक सुरु होती. ग्रामस्थ ऐकन्याच्या मनस्थितीत नव्हते.