रत्नागिरी:- शहरातील झाडगाव-झोपडपट्टी येथील तरुणाना गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला होता. सुनिल चंद्रकांत माने (वय २६, रा. झाडगाव-झोपडपट्टी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी साडेनऊच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनिल माने याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून घराच्या छताच्या लोखंडी बाराला नॉयलॉनची साडी बाधून आत्महत्या केली. नातेवाईक व घरातील मंडळीच्या लक्षात आल्यानंतर त्याला खाली उतरवून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









