रत्नागिरी:- जैन पर्युषण काळात दोन दिवस शहरातील मटण आणि चिकन सेंटर बंद ठेवण्याचे आदेश रनप प्रशासनाने दुकान चालकांना दिले आहेत. १२ सप्टेंबर व १९ सप्टेंबर या दोन दिवशी मटण आणि चिकन सेंटर्स बंद ठेवा असे लेखी आदेश रनप प्रशासनाने काढले आहेत.
जैन पर्युषण काळ हा जैन बाधवांसाठी पवित्र काळ मानला जातो. सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने व या काळातील पावित्र्य जपण्यासाठी हे आदेश रनप प्रशासनाने काढले आहेत. रनप प्रशासनाने याबाबत राज्य शासनाकडून आदेश आल्याने आपण कार्यवाही केल्याची माहिती दिली आहे.









