रत्नागिरी:- शहरातील जे. के. फाईल्स कंपनीजवळ एका वडापावच्या गाडीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जाकर अलीधन शेख (वय ४२, रा. एमआयडीसी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २८) सकाळी पावणेबाराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जाकर शेख हे जे. के. फाईल्स कंपनीजवळील वडापावच्या गाडीजवळ सकाळी दहाच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळले तेथील नागरिक व पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु होण्यापुर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेख यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









