जिल्ह्यातील 19 हजार 462 जणांच्या घरकुल प्रस्तावांना मंजुरी

रत्नागिरी:- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्य़ातील 19 हजार 462 लाभार्थी उद्दिष्टापैकी 19 हजार 325 लाभार्थ्यांया घरकुलांया प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2025 पासून राज्यात महाआवास अभियान सुरू झाले असून या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर केले जाणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिह्यातील 19 हजार 325 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेश पत्र प्रदान करण्यी कार्यवाही सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार करत आहे , राज्य शासनाने उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच हप्ते वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात घरकुलाच्या कोणत्याही लाभार्थ्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही. घरकुल योजनेच्या लाभामध्ये 50 हजार रुपयांनी वाढ करुन ती आता 2 लाख 10 हजार करण्यात आली आहे. भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी मदत करण्यात येत आहे. जमीन खरेदीच्या लाभामध्येही 50 हजार रुपयांची वाढ करून ती 1 लाख रुपये करण्यात आली आहे.