Thursday, October 22, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात श्रमदानातून उभारले ६ हजार ५०१ बंधारे

जिल्ह्यात श्रमदानातून उभारले ६ हजार ५०१ बंधारे

रत्‍नागिरी:- रत्‍नागिरी जिल्‍ह्यात यंदा कमी पाऊस झाल्‍यामुळे दुष्काळाची परिस्‍थिती ओढावली आहे. आता जिल्‍ह्यावर जलसंकट येण्याची शक्‍यता असल्‍यामुळे जिल्‍हा प्रशासन नागरिक, राजकीय नेत्‍यांना सोबत घेऊन वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लोकसहभागातून जलसंधारणच्‍या कमाला गती मिळाली आहे. जिल्‍ह्यात आतापर्यंत ६ हजार ५०१ बंधारे उभारण्यात आली आहेत.

पाच वर्षांत यंदा सर्वाधिक बंधारे उभारण्यात आली आहेत. जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्‍यात बंधारे बांधण्यासाठी राजकीय नेत्‍यासह गावकरी हातभर लावत आहेत.

कोकणातील रत्‍नागिरी जिल्‍ह्यात जून, जुलै वगळता इतर महिन्‍यात पाऊस कमी झाला. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील सहा तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला तसेच उर्वरित तालुक्‍यात ही दुष्काळाची परिस्‍थिती ओढावली आहे. जिल्‍ह्याला ८४७ ग्रामपंचायतींमधून यंदा १२ हजार ७०५ बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्‍यान, आता जिल्‍ह्यात बंधारे बांधण्याला वेग आला आहे. कृषी विभाग, जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने नियोजन केले आहे. जिल्‍ह्यात आतापर्यंत २ हजार ५२५ कच्चे बंधारे, ११७६ वनराई बंधारे आणि २ हजार ८०७ विजय बंधारे असे एकूण ६ हजार ५०१ बंधारे उभारण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामस्‍थ, विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी, राजकीय नेते पुढाकार घेवून श्रमदानातून बंधारे बांधत आहेत. १६ ऑक्‍टोबर रोजी पूर्ण जिल्‍ह्यात एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात बंधारे उभारण्यात आले त्‍यामुळे बंधाऱ्यांची संख्या झपाट्यानी वाढली आहे.

जलसंधारणाच्‍या कामामुळे अखेरच्‍या टप्‍प्‍यातील नदीनाल्‍यांचे पाणी अडवले जाते आणि त्‍यामुळे आसपासच्‍या अनेक विहिरींचा पाणीसाठा टिकून राहतो. पाणीटंचाई लांबवण्यामध्ये हे बंधारे मोठा आधार ठरतात. जिल्‍ह्यात आणखीन दोन वेळा सामूहिक जलसंधारणाची कामे झाल्‍यास सर्वाधिक बंधारे उभारली जातील.

रत्‍नागिरीजिल्‍ह्यात पाऊस थांबल्‍यामुळे वनराई बंधारे बांधण्च्‍या कामांना गती मिळाली आहे. आतापर्यंत ६ हजार ५०१ बंधारे उभारण्यात आले आहे. येत्‍या काळात बंधारे उभारण्याचे काम आणखीन वेगाने होईल अशी माहिती जिल्हा परिषद कृषी सभापती, महेश नाटेकर यांनी दिली.