रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 71 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 3 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 104 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 214 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 103 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 71 हजार 844 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 52 टक्के आहे.
नव्याने 3 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 3 पैकी 24 तासातील 2 तर त्यापूर्वीचे 1 असे 3 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 266 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.01 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 527 तर संस्थात्मक विलीकरणात 497 रुग्ण उपचार घेत आहेत. .