जिल्ह्यात नव्याने 109 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 3 मृत्यूची नोंद 

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 109 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 3 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 109 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 683  इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 53 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 72 हजार 207 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 41 टक्के आहे. 

 नव्याने 3 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 3 पैकी 24 तासातीच 3 मृत्यू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 302 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.04 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 529 तर संस्थात्मक विलीकरणात 572 रुग्ण उपचार घेत आहेत.