जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला; आंबा बागायतदारांची लगबग वाढली 

रत्नागिरी:- पावसाला पोषक हवामान झाल्याने कमाल तापमानात घट झाली तर किमान तापमानात वाढ झाल्याने काही भागात गारठा वाढू लागला आहे. 5 ते 9 डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळीचा जोर ओसरू लागला असल्याने कोकणात थंडी परतण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. 

कमाल तापमानात घट झाली, तर किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली. आगामी आठवड्याच्या कालावधीत कोकण किनारी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. वाढलेले किमान तापमान कमी होऊन तंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लागली, दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक, रायगड जिल्हात सरासरीइतका पाऊस पडला.
चालू आठवड्यात पावसाने उघडीप दिली असली  तरी आगामी आठवड्यात अवकाळीचे सातत्य राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची अटकळ आहे. 5 ते 9 डिसेंबर या आठवडाभरामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

अरबी सागरात सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा आणि उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यामुळे किनारी भघात कमाल-किमान तापमानात घट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. पहाटेच्या तापमानात घट होणार असल्याने कोकणात थंडी परतण्याची शक्यता आहे. या कालावधीत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 0 ते 2 अंशांनी कमी राहण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसगारात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय झाल्याने त्याच्या प्रभाने जवाद नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. हे चक्रीवादळ रविवारी  इशान्येकडून ओडीशाकडे सरकणार आहे. ‘जवाद’चा प्रभाव कोकण किनारपट्टीवर जावणार नसला तरी त्याच्या प्रभावाने समुद्रकिनारी भगात प्रतिकुल हवामानाने अवकाळीचा हलका प्रवास सुरू राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.