रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मागील 24 तासात सापडले आहेत. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 417 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 417 पैकी 338 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 79 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 417 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 14 हजार 38 वर पोहोचली आहे.
चोवीस तासात 1077 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 1,10,119 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज 130 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 11 हजार 429 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 81.41 टक्के आहे.
जिल्ह्यातील मागील 24 तासात सापडलेल्या 417 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 149, दापोली 37, खेड 14, गुहागर 29, चिपळूण 19, संगमेश्वर 121, मंडणगड 22, राजापूर 10 आणि लांजा तालुक्यात 16 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 11.30% आहे.









