जिल्ह्यात 24 तासात केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:– बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 425 तपासण्यांमध्ये केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 12 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

नव्याने एकही रुग्ण कोरोनामुक्त झाला नसून आत्तापर्यंत 81 हजार 908 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.99 टक्के आहे. नव्याने 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 454 झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 7 तर संस्थात्मक विलगीकरणात 5 रुग्ण उपचार घेत आहेत.