रत्नागिरी:- शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 73 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 126 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 72 हजार 628 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 35 टक्के आहे. नव्याने 73 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 76 हजार 180 इतकी झाली आहे.
कोरोनाने होणाऱ्या मृत्यूबाबत बुधवारी दिलासा मिळाला होता. बुधवारी एकही मृत्यू झाला नव्हता. गुरुवारी 2 मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी मृत्यूसंख्या वाढून पाचवर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 350 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.08 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 515 तर संस्थात्मक विलीकरणात 562 रुग्ण उपचार घेत आहेत.









