रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढण्याचे प्रमाण सुरूच आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 588 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 304 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 284 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 588 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 22 हजार 283 झाली आहे. आज 16 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. दररोज पाचशेपेक्षा अधिक जण कोरोना बाधित होत आहेत. नव्याने आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात 588 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 22 हजार 283 जाऊन पोहचली आहे. रविवारी आलेल्या अहवालात 304 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 284 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 16 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 656 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.94 % आहे. आज 1130 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,27,896 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 588 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 167, दापोली 50, खेड 44, गुहागर 91, चिपळूण 88, संगमेश्वर 54, मंडणगड 6, राजापूर 54 आणि लांजा तालुक्यात 34 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 14.83% आहे.









