जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या आरटीपिसीआर चाचणीत हे स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने आपण घरीच उपचार घेणार आहोत असे श्री मिश्रा सांगितले. माझ्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घ्यावी, मास्कचा वापर करावा व आपापली टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केले आहे.