जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्षांकडील आणि विविध विषय समिती सभापती पदांसाठी बुधवारी बिनविरोध निवड पार पडली. शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेना उपनेते डॉ. उदय सामंत यांनी नव्या शिलेदारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली होती. त्यामुळे या या सर्व निवडी ‘बिनविरोध‘ घोषित करण्यात आल्या आहेत. या निवडींमध्ये सामंत यांनी पूर्णपणे नवीन फळीला संधी आणि काही अनुभवी चेहऱयीं सांगड घालत कारभारी सूत्रे सोपवली आहेत.

जिल्हा परिषदाया विषय समिताया सभापतीपदासाठी बुधवारी येथील हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून जीवन देसाई आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन मानसिंग जाधव यांनी कामकाज पाहिले. दुपारी अर्ज दाखल करण्याया मुदतीत सर्व पदांसाठी पत्येकी एक अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे अर्ज मागे घेण्यी मुदत संपता झालेल्या विशेष सभेत सर्व पदीं निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडल्यो जाहीर करण्यात आले. निवड झालेल्या सर्व सभापतों जि.प.अध्यक्ष अस्मिता केंद्रे, सीईओ वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास ाााळके, अतिरिक्त सीईओ परिक्षित यादव यांनी पुष्पगाछ देत अभिनंदन केले. या निवडीवेळी माजी आमदार संजय कदम, सदानंद ााव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत ााव्हाण, राहुल पंडित यांयासह अन्य पदाधिकारी, जि.प.सदस्य यीं उपस्थिती होती.

जिल्हा परिषद निवडणुकीत ज्यांनी जीवाचे रान करून शिवसेना पक्षाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, अशाच चेहऱयांना या निवडीत प्राधान्य देण्यात आले आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ही नवी टीम मैदानात उतरवली असून, आता या नव्या दमाच्या पदाधिकाऱयांया कामकाजाकडे आणि त्यांच्या प्रशासकीय कौशल्याकडे संपूर्ण रत्नागिरी जिह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी विराजमान केलेल्या विलास चाळके यांच्याकडे बांधकाम व आरोग्य या महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. या सर्व नियुक्त्या केवळ सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी असतील, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या संपूर्ण निवडीमध्ये सर्वात जास्त चर्चा ही ‘अर्थ व शिक्षण‘ आणि ‘समाजकल्याण‘ सभापती पदाची रंगली आहे. जिल्हा परिषदेचे अत्यंत मातब्बर आणि अभ्यासू सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱया उदय बने यांनी गोळप गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, या आव्हानाला न जुमानता शिवसेनो नंदकुमार मुरकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाची दखल घेत सामंत यांनी मुरकर यांना ‘अर्थ व शिक्षण सभापती‘ पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवून त्यांच्या निष्ठेचे चीज केले आहे.
अशाच प्रकारे, हातखंबा गटात माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी केलेल्या बंडखोरीला शिवसेनो अॅड. सुयोग कांबळे यांनी सडेतोड उत्तर देत विजय संपादन केला होता. पक्षाशी एकनिष्ठ राहून जागा राखणाऱया कांबळे यांची आता ‘समाजकल्याण सभापती‘ पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जे कार्यकर्ते कठीण काळात पक्षासोबत राहतील, त्यांना सत्तेत मानाचे स्थान दिले जाईल, असा या दिलेल्या पदनिवडीतून स्पष्ट संकेत देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या या नव्या निवडींमध्ये केवळ निष्ठाच नाही, तर ‘प्रादेशिक समतोल‘ साधण्यावरही डॉ. उदय सामंत यांनी विशेष भर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने चिपळूण आणि गुहागर या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांना सत्तेत वाटा देऊन आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये महिला व बालकल्याण सभापती म्हणून सौ. मयुरी मिलिंद शिर्के यांची निवड करून सामंत यांनी चिपळूण तालुक्याला महत्त्वाचे प्रतिनिधित्व दिले आहे. चिपळूण हा जिह्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू असून, तिथे एका महिला नेतृत्वाला संधी देते पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. तर दुसरीकडे, महेश नाटेकर यांच्या रूपाने गुहागर तालुक्याला ‘कृषी व पशुसंवर्धन सभापती‘ पद मिळाले आहे. या विभागाचे सभापतीपद नाटेकर यांच्याकडे सोपवणे हा एक धोरणात्मक निर्णय आहे. यामुळे गुहागरमधील ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार होण्यास मोठी मदत होणार आहे.