जाकादेवी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वा.सुमारास जाकादेवी येथील जानकी नर्सिंग होम येथे घडली.

संदिप गंगाराम मायंगडे (47,रा.तरवळ मायंगडेवाडी, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी संदिप मायंगडे हा नेहमी प्रमाणे सायंकाळी 7 वा.कामावरुन घरी आल्यानंतर अंगणात खुर्चीवर बसला होता. अचानकपणे तो खुर्चीवरुन खाली पडल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारांसाठी जानकी नर्सिंग होम येथे दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी संदिपला तपासून मृत घोषित केले.