जांबुर्डेतील कामगाराचा आकस्मिक मृत्यू

खेड:- तालुक्यातील जांबुर्डे- गवळवाडी येथील गिरणी कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. मारुती लक्ष्मण जाधव (६५) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांना काही दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. यामुळे ते उपचार घेत होते.

गिरणीत आराम करत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यामुळे उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासले असता मृत घोषित केले.