रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ ते बसस्थानक येथून डाव्याबाजूच्या वाहतूकीला जलाराम व अंबिका ट्रेडर्स समोर रस्त्यावर पार्क केलेल्या चार दुचाकी व रिक्षाला टेम्पोने धडक दिली. या अपघातामध्ये चार दुचाकीसह रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडताच टेम्पो चालकाने पलायन केले आहे.
शहर पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरु होती. ही घटना गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास जलाराम व अंबिका ट्रेडर्स येथील रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो (क्र. एमएच-०८ एपी ४४००) हा बसस्थानकहून जयस्तंभ येथे जात असताना त्याने दुकानाच्या समोर पार्क केलेल्या चार दुचाकी व एका रिक्षाला धडक दिली. या अपघातानंतर टेम्पो चालकाने पलायन केले. मात्र ज्यांची वाहने आहेत त्यांनी गर्दी केली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. उशिरा पर्यत शहर पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल कऱण्यात प्रक्रिया सुरु होती.









