जयगड-गणेशवाडीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड-गणेशवाडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वा.सुमारास करण्यात आली.
हरिश्चंद्र रहाटे (63, रा.तेलीवाडी सांडेनलावगण, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस शिपाई रजनिकांत मोहन घवाळी यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार,बुधवारी सायंकाळी संशयित हा मौजे साखहर बौध्दवाडी ते गणेशवाडी जाणाऱ्या रत्याच्या बाजूला आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली. संशयिताविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.