रत्नागिरी:- मद्याच्या नशेत फिरत असताना तालुक्यातील वेतोशी येथील चिरेखाणीच्या पाण्यात पडून प्रौढाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजशेखर शरणप्पा गौडा बीरादर (वय ५०, रा. सापुचेतळे, ता. लांजा, रत्नागिरी) असे मृत मद्यपीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ७) दुपारी चारच्या पुर्वी वेतोशी येथील विकास पाटील यांच्या चिरेखाणीत निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजशेखर बीरादर हे जास्त मद्यपान केलेल्या स्थितीत होते त्यामुळे खबर देणार यांनी त्यांना घरी पावस येथे जाण्यास सांगितले. मात्र तो घरी पोचलाच नाही म्हणून त्याच्या ओळखीच्या लोकांकडे फोनद्वारे चौकशी केली असता त्याचा ठाव ठिकाणाला लागला नाही. राजशेखर यांचा निवळी येथे शोध घेत असता चार च्या सुमारास रवी कोकरे यांनी खबर देणार यांना भेटून विकास पाटील यांच्या वेतोशी येथील चिरेखाणीवर एक माणूस पडलेला आहे. त्यांची खात्री करा असे सांगितले. तेथे जावून पाहिले असता तो राजशेखर बीरादर असल्याचे समजले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.