चार पोलिसांसह रत्नागिरी तालुक्यात 18 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मंगळवारी सकाळी नव्याने 18 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 
 

तालुक्यात सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी रात्री 23, सोमवारी 29 तर मंगळवारी सकाळी 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये शहर पोलीस स्थानकातील 1, एलसीबीतील 2 आणि पोलीस मुख्यालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. 
 

यासह जयगड 2, आरोग्य मंदिर 1, भाट्ये 1, शिवाजी नगर 1, जोशी पाळंद 1, शेट्ये नगर 1, गोळप 2, निवळी फाटा 1, खेडशी फाटा 2, लाला कॉम्प्लेक्स 1, चर्मालय 1 येथे नवे रुग्ण सापडले आहेत.