Saturday, October 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी चाफेरी-बौद्धवाडी येथून वृद्धाचे अपहरण

चाफेरी-बौद्धवाडी येथून वृद्धाचे अपहरण

रत्नागिरी:- तालुक्यातील चाफेरी-बौद्धवाडी येथील वृद्ध सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेला असता अज्ञाताने त्यांचे अपहरण केले. जयगड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ लक्ष्मण पवार (वय ६५, रा. चाफेरी बौद्धवाडी, रत्नागिरी) असे अपहण झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ६) सकाळी दहा ते साडेअकराच्या सुमारास चाफेरी बौद्धवाडी या परिसरात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हेमंत सिद्धार्थ पवार (वय ३४, रा. चाफेरी बौद्धवाडी सध्या रुम. नं ५ चाळ नं १ गणेश नगर डोंबिवली पश्चिम) यांचे वडिल सिद्धार्थ पवार हे मंगळवारी परिसरात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. ते घरी परत आले नाही या प्रकरणी मुलगा हेमंत यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी वृद्धाचे अपहरण झाल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.