Sunday, May 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी चांदोर फाटा येथे अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

चांदोर फाटा येथे अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदोर फाटा येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे अपघात झाला. या अपघातातील मयत स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमंत आप्पासाहेब बडची (वय ३६, रा. सध्या निरुळ चिरेखाण, मुळ ः एैशीळी ता. अथणी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) दुपारी साडेबाराच्या सुमारास चांदोर फाटा येथील कोकरे यांच्या घरासमोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बडची हे हेल्मेटन घालता दुचाकीवरुन जात असताना निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघात झाला. या अपघात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तुकाराम किलारी यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी वरुन पोलिसांनी मृत श्रीमंत बडची याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पुर्णगड पोलिस अमंलदार करत आहेत.