गोळप वायंगणी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील मौजे गोळप, वायंगणी शांतीनगर येथे ०२ मे रोजी एका ४५ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. सुशील तुकाराम भोवड (वय ४५, रा. वायंगणी, भोवडवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मोलमजुरीचे काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील भोवड हे शुक्रवार 2 रोजी सकाळी ८.३० वाजता वायंगणीतील त्यांच्या घरातून मोलमजुरीच्या कामासाठी बाहेर पडले होते. सायंकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. शोध घेत असताना ते गोळप, वायंगणी शांतीनगर येथील मोकळ्या परिसरात मृतावस्थेत आढळले.
या घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.