पावस:- रत्नागिरी-गोळप रस्त्यावर हॉटेल रुद्रजवळ रस्ता ओलांडत असलेल्या एका महिलेला मोटारीने धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. संशयित मोटारचालकाविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक आत्माराम चव्हाण (वय ३४, रा. अभ्युदयनगर नाचणे, रत्नागिरी) असे संशयित मोटारचालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास गोळपसडा येथे घडली. अनंत दत्तात्रय चांदोरकर (रा. टिळक आळी, रत्नागिरी) हे दुचाकीवर (क्र. एमएच-०८-एबी-६२९५) सोबत पत्नी अंकिता अनंत चांदोरकर हिला घेऊन रत्नागिरी ते गोळप असे जात होते.









