गोळप येथे मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा

पावस:- तालुक्यातील गोळप-शिरंबाडवाडीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिलींद सिताराम धुळप (वय ४९, मुळ रा. घुडेवठार, रत्नागिरी. सध्या रा. गोळप, शिरंबाडवाडी-रत्नागिरी) असे संशयित प्रौढाचे नाव आहे.

ही घटना सोमवारी (ता. २९) सकाळी पावणेदहाच्या सुमारास गोळप शिरंबाडवाडी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरील बंद ट्रकच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस हवालदार सुदेश शिंदे यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.