Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी गोळप येथे कार- बुलेटची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जखमी

गोळप येथे कार- बुलेटची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जखमी

रत्‍नागिरी:- रत्‍नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्‍यावरील गोळप येथे मंगळवारी सकाळी 9.45 वा.सुमारास कार आणि दुचाकीची समोरा-समोर धडक होउन अपघात झाला. या अपघाता दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला असून त्‍याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शैलेश प्रकाश मगदूम (32, रा.सन्मित्रनगर, रत्‍नागिरी) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी शैलेश मगदूम आपल्या ताब्यातील बुलेट दुचाकी घेउन पावस ते रत्‍नागिरी असा येत होता. तो गोळप येथे आला असता समोरुन येणाऱ्या कारला दुचाकीची धडक बसून हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा करुन जखमी दुचाकी चालकाला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.