रत्नागिरी:- २३ मार्च २०१५ मध्ये अन्न व औषध प्रशासन, शहर पोलीस व ग्रामीण पोलिसांनी रात्री ११ वाजता रत्नागिरीजवळील मिरजोळे एमआयडीसीतील एका गोदामावर संयुक्तरीत्या धाड टाकली होती. या कारवाईत तब्बल १५ लाख ३६ हजार १३५ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला होता.
याप्रकरणी अमन तुषार देवळेकर (२३, धनजीनाका, रत्नागिरी) यांना अटक करून त्यांचेवर प्रस्तुत प्रकरणी भा. दं.वि. कलम २७२, २७३,१८८ व ३२७ या कलमांखाली व तसेच अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारे ६ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे म. रत्नागिरी येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साो यांनी अमन देवळेकर यांची त्यांचेवरील सदर आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. सदर कामी अमन देवळेकर यांचे वतीने रत्नागिरीतील जेष्ठ विधिज्ञ श्री. दिलीप भार्गव भावे व अॅड.अनिकेत भावे, अॅड. मधुमती कदम, ॲड. मंदार कांबळे यांनी कामकाज पाहीले.









