रत्नागिरी:- शहरातील गीताभवन ते तेलीआळीला जोडणार्या बायपास रत्स्याची दुरावस्था झाली असून त्याच्या डांबरीकरणाकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केले आहे. पावसाळा तोंडावर आला तरीही अजून डांबरीकण न झाल्याने या भागात राहणार्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेली दोन वर्षे शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी नगर परिषदेकडून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे.या रस्त्यावरही पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकताना रस्ता खोदण्यात आलेला होता.परंतु पाईप लाईन टाकून वर्ष झाले तरीही या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलेले नाही.हा सर्व रस्ता उताराचा असून रस्त्याची दुर्दशा झालेली आहे.रस्त्यावर मोठे मोठे खड्डे तसेच चर पडलेले आहेत.तसेच हा रस्ता निसरडा झालेला असल्याने पादचारी आणि दुचाकी चालकांना या रस्त्यावरुन ये-जा करणे कठिण झालेले आहे. काही दिवसांवर पावसाळा आलेला असून या रस्त्यावरुन वाहतूक करणे अत्यंत जिकिरीचे होणार आहे. या रस्त्यावर अपघात झाल्यावर त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
नगर परिषदेने शहरातील मुख्य रस्ते आणि इतर गल्ली-बोळांमध्ये डांबरीकरण केलेले असून नगरपरिषदेपासून एक मिनिटाच्या अंतरावर असलेल्या या रस्त्याकडे मात्र डोळेझाक करत आहे.या प्रभागातील संबंधित सेनेच्या नगरसेवकाला याबाबत वारंवार सांगूनही तो तेथील नागरिकांच्या डांबरीकरणाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत आहे.तसेच नगर परिषदेचा बांधकाम अभियंताही या रस्त्याकडे दुर्लक्ष करुन शहरातील काही खासगी कॉम्पलेक्समध्ये नगरपरिषदेमार्फत डांबरीकरण करण्यात व्यस्त असून या सार्वजनिक रस्त्याकडे नप जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे तेथील नागरिकांकडून बोलले जात आहे.
[29/05, 12:25 pm] RE-Pranil: