Tuesday, September 8, 2026
spot_img
Home संगमेश्वर गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

देवरुख:- देवरुख परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देवरुख – रत्नागिरी मार्गावर आंबव गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी गवारेड्याने केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वप्निल जयराम पेडामकर (३८, रा. साडवली सह्याद्रीनगर) या तरुणाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली असून, उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत स्वप्निल गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

दहीहंडी उत्सवाच्या अगदी तोंडावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे सह्याद्रीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. सह्याद्री नगर मित्र मंडळाने या संकटकाळात मानवता दाखवत आपला मोठा दहीहंडी उत्सव रद्द केला होता आणि जमा झालेला निधी स्वप्निलच्या उपचारासाठी सुपूर्द केला होता. मात्र, उपचारांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याने एका उमद्या तरुणाला अवेळी प्राण गमवावे लागले आहेत. स्वप्निल यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारרוч करण्यात येणार आहेत.