गणेशोत्सवासाठी कोरे मार्गावर सहा विशेष रेल्वे गाड्या

रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण खुले होताच काही मिनिटांत फुल्ल झाल्यानंतर आता या गाड्यांच्या कोकणात गणपतीसाठी कोकणात गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आधार घ्यावा लागणार आहे.

रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांमध्ये १) मुंबई सेंट्रल ते ठोकूर साप्ताहिक विशेष, २) मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड आठवड्यातून सहा दिवस, ३) वांद्रे ते कुडाळ साप्ताहिक विशेष, ४) अहमदाबाद ते कुडाळ साप्ताहिक विशेष, ५) विश्वामित्री ते कुडाळ साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन आणि ६) अहमदाबाद ते मंगळूरु साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन या गाड्यांचा समावेश आहे.

याआधी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने सात विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या. आता पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने वेगवेगळ्या सहा मार्गांवर गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.