गणेशोत्सव काळात सुरू केलेल्या ३ रेल्वेगाड्या ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात सुरू केलेली दिवा ते सावंतवाडी, रत्नागिरी – मडगाव आणि सावंतवाडी ते मडगाव या रेल्वेगाड्या आता ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहेत. या मार्गावर नियमितपणे आरक्षित विशेष एक्स्प्रेस धावतील, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सावंतवाडी रोड ते दिवा जंक्शन ही गाडी सावंतवाडी रोड’वरून रोज सकाळी ८:४५ वाजता सुटेल. दिवा जंक्शनला रात्री ८.१० वाजता पोहचेल. परतीसाठी दिवा जंक्शन येथून रोज सकाळी ६.५५ वाजता सुटून सावतवाडीला सायंकाळी ५.१५ वाजता पोहोचेल. मडगाव जंक्शन- रत्नागिरी- मडगाव जंक्शन गाडी नियमितपणे मडगाव जक्शन येथून सायंकाळी ७.२५ वाजता सुटेल. ही गाडी ३० नोव्हेंबरपर्यंत रोज धावणार आहे. परतीसाठी ही गाडी रत्नागिरी येथून रात्री २.१२ वाजता सुटेल. मडगाव जंक्शनला सकाळी ७.४५ वाजता पोहचेल. रत्नागिरी ते दिवा जंक्शन ही गाडी ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. रत्नागिरी येथून रोज पहाटे ५:३० वाजता सुटेल. दिवा जंक्शनला दुपारी १.२५ वाजता पोहचेल. परतीसाठी ही गाडी दिवा जंक्शन येथून दुपारी ३.३० वाजता सुटून रत्नागिरीला रात्री ११.२० वाजता पोहचेल. मडगाव ते सावंतवाडी रोड, ही गाडी मडगाव जंक्शन येथून सकाळी ६.२० वाजता सुटून सावंतवाडीला सकाळी ८.२० वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून सायकांळी ५.४५ वाजता सुटेन मडगाव जंक्शनला रात्री ८.२५ वाजता पोहोचेल.