रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते जयगड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुधाकर सुर्वे (वय ४८, रा. भंडारवाडा-मालगुंड, रत्नागिरी) असे मद्यपान करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.
ही घटना बुधवारी (ता. ३) दुपारी दीडच्या सुमारास गणपतीपुळे ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावरील गायवाडी बीचच्या विरुद्ध बाजूस जंगलमय भागात पायवाटेवर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल निलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









