Saturday, June 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी खेडशी येथे एसटीच्या धडकेत वासराचा मृत्यू

खेडशी येथे एसटीच्या धडकेत वासराचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीक च्या खेडशी येथे एसटीची वासराला धडक झाली. या अपघातात वासराचा जागीच मृत्‍यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरलीधर पुंडलिकराव चांभारे (रा. चिपळूण, रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ११) सकाळी साडेनऊच्या सुमारास खेडशी येथील श्रीराम फायनान्स गोडावूनच्या समोर घडली. या प्रकरणी गणेश विजय गायकवाड (वय ४२, रा. लक्ष्मीनारायण नगर खेडशी, रत्‍नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, गुरुवारी सकाळी मुरलीधर चांभारे हे एसटी ( क्र. एमएच-२०-बीएल- ३५७७) घेऊन चिपळूण ते रत्‍नागिरी असा येत होते. ते खेडशी येथे आले असता त्‍याने एसटी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रस्त्‍याच्या बाजुला असलेल्या गायीच्या वासराला धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती कि, त्‍यामुळे वासराचा जागीच मृत्‍यू झाला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार टेमकर करत आहेत.