Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी खेडशी एकतानगर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

खेडशी एकतानगर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील एकतानगर परिसरात ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्यापूर्वी एका ३३ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी पंख्याला नायलॉन साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नम्रता बाळासाहेब अकिवटे (वय ३३, रा. एकतानगर, खेडशी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, नम्रता अकिवटे यांनी खेडशी येथील त्यांच्या घरी सिलिंग फॅनला नायलॉनची साडी बांधली आणि तिचा फास गळ्यात अडकवून गळफास घेतला. ही घटना सायंकाळी ५.१५ च्या सुमारास उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.१० वाजता करण्यात आली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. अकिवटे यांच्या आत्महत्येमुळे एकतानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात ‘अमृ. क्र. ९८/२०२५’ प्रमाणे ‘बी.एन.एस.एस १९४’ अन्वये करण्यात आली आहे. सदर आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.